बिल गेट्स यांनी विकत घेतला तब्बल 328 कोटींचा आलिशान बंगला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील सॅन डियागो शहरामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत चक्क 42 मिलीयन डॉलर म्हणजेच 328 कोटी रुपये इतकी आहे.

बिल आणि मेलिंडा यांनी घेतलेला हा बंगला अगदी समुद्रकिनार्‍यावर आहे. या बंगल्याचे क्षेत्रफळ 5 हजार 800 स्वेअरफूट इतके आहे. बंगल्याध्ये सहा मोठे मास्टर बेडरुम आहेत. बंगल्याच्या मागच्या बाजूस लगेच समुद्रकिनारा असून हे प्रायव्हेट बीचही गेट्स यांच्याच मालिकीचे होणार असल्याचे समजते. बंगल्यामध्ये मोठा स्वीमींग पूल, 10 लोक मावतील एवढा मोठा जकुजी एरिया आणि इतरही अनेक सोयीसुविधा या बंगल्यामध्ये आहेत. या परिसरातील सर्वात महगाड्या व्यवहारांपैकी हा व्यवहार आहे.

याआधी अ‍ॅमेझॉन या जगातल्या अव्वल ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोसने जानेवारी महिन्यात प्रेयसी लारा सांचेझसाठी व्हॅलेंटाइन्स गिफ्ट म्हणून चक्क 1 हजार 178 कोटींचा बंगला खरेदी केला. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती डेव्हिड जिफिन यांचा लॉस एंजलिसमधील अलिशान बंगला जेफ यांनी आपल्या प्रेयसीसाठी भेट म्हणून विकत घेतला. हा व्यवहार लॉस एंजलिसमधील सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे. याआधी माध्यम सम्राट रूपर्ट मरडॉक यांचा मुलगा लॅचलॅन याने 2019 साली शहरामधील चार्टवेल इस्टेट येथील ब्रेवली हिल्स नावाने ओळखला जाणारा बंगला एक हजार 71 कोटींना विकत घेतला होता.