बिल गेट्स सांगितलं – कशाप्रकारे कोरोना काळानंतर बदलून जाईल व्यवसायाची पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीने ऑफिमध्ये काम करण्यापासून बिझनेस ट्रॅव्हलच्या पद्धतीत मोठे बदल करण्यास भाग पाडले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचे म्हणणे आहे की, महामारी संपल्यानंतर सुद्धा स्थिती पहिल्यासारखी राहणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका कॉन्फरन्समध्ये मुलाखत देताना गेट्स यांनी म्हटले की, भविष्यात काम करण्याची पद्धत एकदम बदललेली असेल. गेट्स यांच्यानुसार, सर्वात मोठा बदल काम करण्याच्या पद्धतींमध्ये आणि बिझनेस ट्रॅव्हलबाबत होईल.

गेट्स यांनी म्हटले, माझा अंदाज आहे की, 50% बिझनेस ट्रॅव्हल आणि ऑफिसमध्ये काम करण्याचा दिवस 30% पर्यंत कमी होईल. एखाद्या बिझनेस प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी फिजिकल पद्धतीने आता आमने-सामने बसून चर्चा करणे ओल्ड स्टँडर्ड होईल. अशाप्रकारच्या बिझनेस ट्रिपसाठी कंपन्या आता लवकर तयार होणार नाहीत.

घरून काम करण्याच्या नव्या पद्धतीबाबत गेट्स यांचे म्हणणे आहे की, काही कंपन्या यापैकी एक पर्याय निवडणे जास्त पसंत करतील. त्यांनी ट्विटरचे सुद्धा उदाहरण दिले. नुकतेच ट्विटरने म्हटले आहे की, त्यांचे कर्मचारी नेहमीसाठी कुठूनही काम करू शकतात.

काय असेल व्हर्च्युअल मीटिंग्जची दूसरी बाजू?
मात्र, गेट्स यांनी या व्हर्च्युअल मीटिंग्जच्या दुसर्‍या बाजूचा सुद्धा उल्लेख केला. ते म्हणाले, व्हर्च्युअल मीटिंग्जमध्ये कुणाला व्यक्तीगत प्रकारे जाणून घेण्याच्या संधी खुप कमी होतील. त्यांनी इंटरव्ह्यूत म्हटले की, या वर्षी त्यांना कोणताही नवीन मित्र बनवण्याची संधी मिळली नाही. व्हर्च्युअल मीटिंग्जसाठी वापरल्या जाणार्‍या सॉफ्टवेयर्समध्ये सुद्धा मोठे बदल करण्याची गरज आहे.

काम करण्याच्या नव्या पद्धतीच्या शोधात कंपन्या
अनेक कंपन्या (विशेषकरून टेक क्षेत्रातील कंपन्या) भविष्यात काम करण्याची पद्धत शोधत आहेत. यावर्षी कोविड-19 महामारीमुळे या कंपन्यांना आपल्या कार्यशैलीत मोठे बदल करावे लागत आहेत. ट्विटर हीच केवळ एकमेव कंपनी आहे, जी आपल्या कर्मचार्‍यांना कुठूनही काम करण्याची संधी देत आहे.

हायब्रिड वर्कप्लेसकडे वाटचाल करत आहे मायक्रोसॉफ्ट
Slack, Stripe आणि फेसबुकसारख्या कंपन्यांनी म्हटले आहे की, त्यांचे कर्मचारी हेडक्वार्टरशी रिलोकेट करू शकतात. मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की, त्यांचे कर्मचारी ’हायब्रिड वर्कप्लेस’ मॉडलवर शिफ्ट होतील. या अंतर्गत त्यांना आठवड्यातील आर्ध्या दिवसांसाठीच ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागेल. इतर दिवशी ते कुठूनही काम करू शकतील.

कॉर्पोरेट ट्रॅव्हलला पूर्वीच्या स्तरासाठी लागतील अनेक वर्ष
बिझनेस ट्रॅव्हलबाबत गेट्स यांची ही भविष्यवाणी नुकत्याच इंडस्ट्री एक्सपर्टसने केलेल्या रिसर्चसारखी आहे. या रिसर्चमध्ये एक्सपर्टने अंदाज वर्तवला होता की, कोरोना काळाच्या अगोदरच्या स्तरावर पोहचण्यासाठी अनेक वर्ष लागतील. ऑक्टोबरमध्ये बँक ऑफ अमेरिकेच्या रिसर्चनुसार, 2023 किंवा 2024 च्या अगोदर कॉर्पोरेट ट्रॅव्हल अगोदरच्या स्तरावर येणार नाही.