Bindi Skin Allergy | टिकली लावल्याने त्वचेची ॲलर्जी होत असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टिकलीला केवळ हिंदू संस्कृती विशेष महत्त्व आहे. जर टिकली पारंपारिक पोशाख म्हणजे साडी, सूट यावर लावली असेल तर आणखीच उठून दिसते. पूर्वीच्या काळी स्त्रिया टिकलीऐवजी कुंकू लावायच्या जे नैसर्गिकरित्या तयार केले जात असे, पण आता आर्टिफिशयल टिकलीमुळे कपाळावर एलर्जीची (Bindi Skin Allergy) समस्या सुरू होते. कपाळावर तांबड्या रंगाचे ठसे येतात जे फार वाईट दिसते. टिकलीमुळे झालेली एलर्जी (Bindi Skin Allergy) कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या.

टिकलीमुळे ॲलर्जी का होते?
टिकलीमुळे होणार्‍या ॲलर्जीला टिकली डर्मेटाइटिस म्हणतात. टिकली तयार करताना, पैरा टर्शियरी ब्यूटिल फिनॉल नावाचे रसायन वापरले जाते. ज्यामुळे संवेदनशील त्वचेवर रिएक्शन होते. जास्त काळ टिकली ठेवल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते. ज्यामुळे कपाळावर खाज सुटणे सुरू होते.

ॲलर्जीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचार

1) खोबरेल तेल
नारळ तेल त्वचेच्या ॲलर्जीसाठी सर्वोत्तम आहे. हे तेल नैसर्गिकरित्या कार्य करते आणि ॲलर्जीमुळे होणारी खाजेजी समस्या कमी करते. हे लावल्यास खाज सुटणे तसेच कपाळावर पडलेले पांढरे निशान देखील कमी होतात.

2) तीळाचे तेल
जर आपल्याला टिकलीमुळे ॲलर्जी होत असेल तर तीळ तेल लावा. यासाठी 2-3 थेंब तीळ तेल कपाळावर आणि चेहऱ्यावर लावा आणि चांगली मालिश करा.

3) कोरफड जेल
टिकलीमुळे ॲलर्जी झाल्यास कोरफड जेल फायदेशीर आहे.
रात्री झोपताना कपाळावर कोरफड जेल लावा.
सर्व चेहऱ्यावर कोरफड जेल लावू शकता.
दुसर्‍या दिवशी चेहरा स्वच्छ करा तुम्हाला लवकरच त्याचा परिणाम दिसेल.

Web Titel :- Bindi Skin Allergy | these home remedies to get rid of bindi skin allergy

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट