Biporjoy Cyclone Update | ‘बिपरजॉय’मुळे गुजरातमध्ये प्रचंड नुकसान! अनेक झाडे कोसळली; 22 लोक जखमी, तर 23 जनावरांचा मृत्यू

मुंबई/नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Biporjoy Cyclone Update | बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone Update) गुजरातच्या (Gujarat) किनारपट्टीला धडकले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ताशी 145 किमी वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे 22 लोक जखमी (22 People Injured) झाले असून 23 जनावरांचा मृत्यू (23 Animal Deaths) झाला आहे. 524 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे 940 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. (Heavy Rainfall And Strong Winds)

आतापर्यंत (Biporjoy Cyclone Update) 74 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नुकसान झालेल्या भागात एनडीआरएफचे पथकाकडून (NDRF Team) मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, सखल भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये पाऊस (Gujarat Rain) पडण्याची शक्यता असून, त्यात कच्छ, पाटण, बनासकांठा येथे अधिक पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

गुजरात आणि पाकिस्तानच्या (Gujarat And Pakistan) किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी धडकले आहे. त्यानंतर गुजराततील अनेक शहरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही 125 ते 145 किमी इतका आहे. त्यामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. दरम्यान, राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

गुजरातमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) देखील वातावरण बदलले आहे.
काही प्रमाणात वारा आणि पावसाचे वातावरण झाले आहे.
शुक्रवार पहाटेपासून वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छ आणि सौराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग ताशी115 ते 125 किलोमीटर आहे.
जखौ बंदरापासून हे चक्रीवादळ केवळ 10 किलोमीटर दूर आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार (Indian Meteorological Department-IMD), हे वादळ शनिवारी दक्षिण राजस्थानमध्ये (South Rajasthan) पोहोचेल. त्यामुळे तिथे हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title :   Biporjoy Cyclone Update | landfall today imd gujarat maharashtra flood storm rain alert

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

Akashvani Pune | ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच प्रसारित होणार, प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती