Akashvani Pune | ‘आजच्या ठळक बातम्या’ पुण्यातूनच प्रसारित होणार, प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पुणे आकाशवाणी केंद्रातील (Akashvani Pune) प्रादेशिक बातम्यांचा विभाग (Regional News Section) छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, याला या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आकाशवाणीच्या (Akashvani Pune) केंद्रातूनच ‘आजच्या ठळक बातम्या’ प्रसारित होणार आहेत.

 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Union Minister Anurag Thakur) यांनी पुणे आकाशवाणीवरुन (Akashvani Pune) प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजनगरला (Chhatrapati Sambhajinagar) हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar) यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क करुन या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे (Prasar Bharati) अपूर्व चंद्र (Apoorva Chandra) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली. त्यानंतर पुणे आकाशवाणी वरुन प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

 

 

प्रकाश जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी याविषयी अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर हा निर्णय मागे घेतला. याबाबत स्वतंत्र सविस्तर चर्चा जावडेकर दिल्लीत गेल्यानंतर करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील या निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी पत्र लिहून अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं.

 

किती वाजता प्रसारित होतं बातमी पत्र?

आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी 7.10 वाजता पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर 8 वाजता, 10.58 आणि 11.58 वाजता तसेच सायंकाळी 6 वाजता बातमीपत्र सादर केलं जातं. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

 

1953 मध्ये झाली होती स्थापना

पुण्याती केंद्राची स्थापना 1953 मध्ये झाली होती. देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत.
सुमारे 24 लाख श्रोते नियमितपणे कार्य़क्रम ऐकतात. या केंद्रावरुन गेल्या 40 वर्षापासून बातम्या प्रसारित होत होत्या.
मात्र, या निर्णयामुळे नियमित बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची गैरसोय होणार होती.
अखेर हा निर्णय मागे घेतल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Web Title :  Akashvani Pune | will be broadcast from pune akashvani station prasar bharati decision cancelled

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा