वाढदिवस विशेषांक 

पुणे : पाेलीसनाामा ऑनलाईन

१ ] करीना कपूर 

हिंदी चित्रपट सृष्टीत ‘बेबो’  म्हणून परिचित असणारी करीना बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. करीना कपूरचा  जन्म २१ सप्टेंबर १९८०  रोजी मुंबईत झाला. तिचे करीना  नाव ‘अॅना कॅरिओना ‘ या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यन्त सहा वेळा फिल्म फेयर पुरस्कार विजेत्या  करिना कपूरचा  बॉलीवूडच्या  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो.
[amazon_link asins=’B078M16N8P,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d06eb4f7-bcec-11e8-ac30-475ba6e585e0′]

कौटुंबिक पार्श्वभूमी-

भारतीय चित्रपट सृष्टीत मोलाचं योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांची नातं आहे. तिचे वडील रणधीर कपूर आणि आई  बबिता हे दोघेही सत्तरीच्या काळातील प्रसिद्ध कलाकार आहेत.  करीनाने सैफअली खानशी लग्न केल्यापासून ती अधिकच चर्चेत आली. त्यांचा मुलगा तैमुर हा बॉलिवूडचा  प्रसिद्ध स्टार कीड आहे.

करिअर
रेफ्युजी (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करून, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु मुझे कुछ कहना है (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले चमेली चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेअर विशेष पुरस्कार मिळाला.

चित्रपटांमध्ये काम करत असतानाच ती फॅशन शो व मॉडेलिंगही करते याव्यतिरिक्त ती सहलेखक म्हणून काम करते. २०१४ पासूनपासून मुलीच्या शिक्षणासाठी ती युनिसेफ सोबत काम करत आहे.
२ ]  शिंजो अॅबे

जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे व्यक्ती बनणारे शिंजो अॅबे यांचा जन्म २१ सप्टेंबर, १९५४ रोजी टोकियो, जपान येथे झाला. जपानमधील लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे ते नेते आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षी  ते २००६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यावेळी ते जपानमधील सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले होते.
[amazon_link asins=’B07BR2PH18,B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1094fab0-bced-11e8-b8a9-19dc8abfc646′]

विशेष म्हणजे  कालच जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदाची पुर्वनिवडणूक तिसऱ्यांदा जिंकली आहे. यामुळे ते पुढील तीन वर्षे पंतप्रधानपदी कायम राहणार आहे. तसेच ते यामुळे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे व्यक्ती बनणार आहेत.

या विजयामुळे उत्तर कोरियाबाबत त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला तसेच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यास आबे यांना बळ मिळाले आहे. भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय संबंध चांगले आहे. भारतात बुलेट ट्रेनसाठी जपान मदत करत आहे.

पुणे : झोपेत असलेल्या इसमावर कोयत्याने वार, आरोपी अटकेत 

लाचखोर डॉक्टरकडे सापडले कोट्यावधीचे घबाड