Birthday SPL : ‘किंग खान’नं ‘अशी’ खर्च केली होती 50 रुपयांची पहिली कमाई ! आज कोट्यवधीचा मालक

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा आज वाढदिवस आहे. आज शाहरुख बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जातो. आज तो अब्जावधीचा मालक आहे. असं असलं तरी अनेकांना त्याच्या पहिल्या कमाईबद्दल माहिती नाहीये. आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत.

लहान पडद्यावर काम करण्याआधी शाहरुख एका तिकीट काऊंटरवर काम करत होता. ही त्याची पहिली नोकरी होती. आयुष्यातील त्याची पहिली कमाई होती 50 रुपये. जर तुम्ही वाचाल की, त्यानं त्याची पहिली कमाई कशी खर्च केली तर तुम्ही चुकीत व्हाल. शाहरुख त्याच्या पहिल्या कमाईतून खास आग्र्याला ताजमहाल (Taj Mahal) पहायला गेला होता. त्याला ताजमहाल पाहण्याची खूप इच्छा होती. पहिल्या कमाईतून त्यानं त्याची ही इच्छा पूर्ण केली होती.

शाहरुख आज कोट्याधीश

फक्त अॅक्टींगच नाही तर बिजनेसमध्ये देखील शाहरुख नंबर 1 आहे. 2017 च्या फोर्ब्स (Forbes) रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती 600 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4200 कोटी एवढी आहे. 2018 तो देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला होता. मुंबईत असणारा त्याचा बंगला मन्नतची आज 200 कोटी एवढी किंमत आहे. आलिबागला त्याचं फार्म हाऊस आहे. याचीही किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. दुबई आणि लंडनमध्ये त्याचे आलिशान बंगले आहेत. याची किंमत 170 कोटी रुपये आहे.

इतकंच नाही तर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या आयपीएल (IPL) टीमचाही तो मालक आहे. रेड चिलीज (Red Chillies) नावाचं त्याचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. याची वार्षिक उलाढाल 500 कोटींपेक्षा अधिक आहे एका जाहिरातीसाठी तो 10 ते 12 कोटी घेतो. सध्या तो जवळपास 10 कपंन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यातून तो दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपये कमावतो. याशिवाय अनके महागड्या गाड्यांचा तो मालकही आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.