Photos : ‘या’ अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये रहायची दिशा पाटनी; बॉयफ्रेंडचं दुसऱ्याच अभिनेत्यासोबतचं रिलेशन ऐकून केलं Breakup

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. आज आपण तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल जाणून घेणार आहोत जे खूप कमी लोकांना माहित आहे. इतकंच नाही तर तिचं ब्रेकअप कसं झालं याचीही माहिती घेणार आहोत.

birthday special was disha patanis ex parth samthaan dating vikas gupta was he bisexual

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा दिशा इंडस्ट्रीत जास्त अ‍ॅक्टीव्ह नव्हती. एक वेळी अशी होती जेव्हा दिशा आणि अ‍ॅक्टर पार्थ समथान (Parth Samthaan) रिलेशनशिपमध्ये होते. दोघंही लिव्हइन मध्ये रहात होते. तेव्हा दिशा जास्त फेमसही नव्हती. त्यावेळी पार्थ मात्र चांगलाच फेमस होता. दोघांची लव्ह स्टोरी वर्षभर चालली. परंतु एक व्यक्ती आली आणि त्यांच्या नात्याला नजर लागली.

 

birthday special was disha patanis ex parth samthaan dating vikas gupta was he bisexual

टीव्ही निर्माता विकास गुप्ता (Vikas Gupta) याच्यामुळं दिशा पाटनी आणि पार्थ समथान यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. 2015 साली पार्थ आणि विकास रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा रंगली. याच
काळात पार्थनं विकासला लीगल नोटीस पाठवत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

birthday special was disha patanis ex parth samthaan dating vikas gupta was he bisexual

इतकंच नाही तर पार्थ आणि विकास यांचे काही इंटिमेट फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पार्थ बायसेक्शुअल असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या. एकीकडे तो दिशासोबत नात्यात होता. तर दुसरीकडे त्याचं विकास सोबत रिलेशन असल्याच्या चर्चा होत्या.

birthday special was disha patanis ex parth samthaan dating vikas gupta was he bisexual

दिशाला हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसला. यानंतर तिनं पार्थसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. अखेर हे नातं संपुष्टात आलं.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.