#Birthday SPL : माधुरी दीक्षित खूप सडपातळ आहे म्हणून प्रसिद्ध मराठी सिंगरच्या घरच्यांनी लग्नासाठी दिला होता ‘नकार’ ! ‘हा’ किस्सा खूपच ‘इंट्रेस्टिंग’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. माधुरीचा जन्म 1967 साली मुंबईत झाला होता. अबोध सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. माधुरीनं वयाच्या तिसऱ्या वर्षीच डान्स शिकायला सुरुवात केली होती. ती अनेकदा आपल्या पर्सनल लाईफमुळंही खूप चर्चेत आली आहे. माधुरीचं नाव संजय दत्त, अनिल कपूर अशा काही स्टार्ससोबत जोडलं गेलं आहे. संजय दत्त आणि माधुरी दीक्षितचं अफेअर 90 च्या दशकात खूप चर्चेत राहिलं होतं. आज आपण माधुरीच्या आयुष्यातील लग्नाबद्दलच एक इंट्रेस्टिंग किस्सा जाणून घेणार आहोत. हा किस्सा एका प्रसिद्ध सिंगरबद्दल आहे.

90 च्या दशकात आपल्या आवाजानं सर्वांना वेड लावणाऱ्या सिंगर सुरेश वाडकर यांना माधुरी दीक्षित खूप आवडायची. त्यांना माधरीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. ते उत्तम गायक होते आणि मराठी सिनेमात त्यांची चांगली पकड होती. माधुरीलाही ते आवडत होते.

माधुरीच्या कुटुंबीयांना कोणी सांगितलं की, सुरेशसाठी मुलगी बघणं सुरू आहे. त्यांनी माधुरीसाठी स्थळाबद्दल बातचित केली आहे. माधुरीच्या घरच्यांनाही हे स्थळ आवडलं. जेव्हा माधुरीच्या घरचे सुरेशच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरच्यांनी मुलगी खूप सडपातळं आहे असं सांगत माधुरीला रिजेक्ट केलं.

यानंतर माधुरीनं अनेक सुपरहिट सिनेमे दिले. बॉलिवूडमध्ये एक सेलेब्रिटी म्हणून ती ओळखली जाऊ लागली. माधुरीचं नाव अनिल कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतही जोडलं गेलं आहे. असंही म्हटलं जातं की, अनिल कपूरनं माधुरीला अमिताभ बच्चनसोबत काम करण्यास मनाई केली होती.