#Birthday SPL : मुंबईतील चाळीत झाला होता जन्म, अ‍ॅक्टींगसाठी नाकराली होती नोकरी ! जाणून घ्या विकी कौशलचा पूर्ण ‘प्रवास’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार विकी कौशल आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज इंडस्ट्रीत विकीनं आपली वेगळी ओळख तयार केली आहे. परंतु यासाठी त्यानं खूप मेनहत घेतली. त्याचे वडिल एक स्टंटमॅन होते. त्यांनाही कामसाठी खूप स्ट्रगल करावा लागला होता. विकीचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबईतील एका चाळीत झाला होता. आज आपण त्याच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

विकीनं राजीव गांधी इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनियरींग केली होती. वडिलांना वाटत होतं विकीनं नोकरी करून सेट व्हावं. परंतु विकीला अॅक्टर व्हायचं होतं. त्यानं नोकरीची ऑफर नाकारून किशोर नमित कपूर अॅक्टींग अॅकेडमी जॉईन केली. यानंतर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं.

विकीन अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानं असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. 2012 साली आलेल्या अनुराग कश्यपच्या लव शव ते चिकन खुराना सिनेमात लाहन रोल मिळाला. यानंतर बॉम्बे वेलवेट मध्येही त्यानं लहान रोल केला. 2015 मध्ये आलेल्या मसान सिनेमात त्याला लिड रोल मिळाला. हा सिनेमा त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर त्यांना अनेक ऑफर मिळू लागल्या.

यानंतर विकीनं जुबान, रमन राघव 2.0, राजी, संजू अशा अनेक सिनेमात काम केली. परंतु 2019 साली आलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमानं त्याचं नशीब उजळलं. सिनेमानं कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले.

विकीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर शर्लिन सेठीसोबत त्याच्या रिलेशन आणि ब्रेकअपमुळं तो अनेकदा चर्चेत आला आहे. आता कॅटरीना कैफसोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो शुजित सरकारच्या सरदार उधम सिंह या सिनेमात काम करणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे.