#Birthday SPL : डान्स परफॉर्मंस ते बॉलिवूड एन्ट्री ! ‘ते’ 5 निमित्त जेव्हा ‘बेबी डॉल’ सनी वादात सापडली

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सनी लिओनीनं पॉर्न इंड्स्ट्रीतून येऊन आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. लिड अ‍ॅक्ट्रेस म्हणून जरी ती यशस्वी झाली नाही तरीही आयटम नंबर आणि डान्स नंबरनं नेहमीच बाजी मारत असते. आज(बुधवार दि 13 मे) सनी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत जेव्हा सनी एकदा नाही तर 5 वेळा वादात सापडली होती.

1) बॉलिवूड एन्ट्री- सनी आधीच पॉर्न स्टार म्हणून फेमस होती. ती बॉलिवूडमध्ये आल्यानंतर बराच वाद झाला. तिनं अनेक सिनेमात बोल्ड सीन उत्तम साकारले. जेव्हा ती वेगानं पुढे येऊ लागली तेव्हा अनेकजण तिला विरोध करू लागले.

2) लोकांनी दिली आत्महत्या करण्याची धमकी- बंगळुरू न्यू ईयर ईवच्या निमित्तानं आयोजित होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये सनी लाईव्ह परफॉर्मंस करणार होती. काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला आणि हे अनैतिक असल्याचं म्हटलं. हे कर्नाटकच्या संस्कृतीविरोधात आहे असं सांगत अनेकांनी मान्यता टेक पार्कमध्ये धरणे केलं. लोकांनी धमक्या दिल्या की, सनीनं जर सादरीकरण केलं तर आम्ही मास सुसाईड करू.

3) पॉर्न सिनेमात काम आणि डायरेक्शन- सनीवर आरोप होते की, ती तिच्या मर्जीनं पॉर्न इंडस्ट्रीत गेली आणि काही काळातच ती एक एंटरप्रोन्योर बनली. तिनंही कमी वेळात अशा सिनेमांचं प्रॉडक्शन आणि डायरेक्शन सुरू केलं.

4) वन नाईट स्टँड- वन नाईट स्टँड सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सनी म्हणाली होती की, वन नाईट
स्टँड कोणाची चॉईसही असू शकते. लग्नाआधी सिंगल असताना तिनंही असं केलं आहे असंही ती म्हणाली आहे. तिच्या या विधानाची खूप चर्चा झाली होती.

5) जाहिरातींमुळं वाढतील बलात्कार- सीपीआय नेते अतुल कुमार यांनी सनीवर आरोप केला होता की, सनी लिओनीनं कंडोमची जाहिरात केल्यानं देशात बलात्काराच्या संख्येत वाढ होईल. सनीनं ओपनली याचं खंडन केलं होतं.