Birthday SPL : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा ‘तो’ ‘सुपरहॉट’ अवतार, ज्यानं घातला होता सोशलवर राडा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   MTV व्हिजे रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या तिचे काही फोटो सोशलवर राडा घालताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत चर्चेत येताना दिसत आहे. रिलेशनशिपमुळंही दोघांची खूप चर्चा झाली होती. आज (बुधवार दि 1 जुलै 2020) रिया तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. रियाचा जन्म 1 जुलै 1992 रोजी बंगाली कुटुंबात झाला आहे. आज आपण रियाचा तो बोल्ड बिकिनी अवतार बघणार आहो ज्यानं सोशलवर राडा घातला होता. जे फोटो अजूनही व्हायरल होत आहेत.

रियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. याचे कराण म्हणजे तिची ब्युटी आणि हॉटनेस. अनेक फोटोत रिया बोल्ड बिकिनीत दिसत आहे. काही फोटोत तिनं मोनोकनीही घातली आहे. इतरही काही फोटोत तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. सध्या तिचे फोटो झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत.

रिया आणि सुशांतच्या लव लाईफबद्दल बोलायचं झालं तर सुशांत आपलं घर सोडून रियाच्या घरी शिफ्ट झाला होता. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, सुशांत आपल्या घरातून बॅग आणि इतर साहित्य घेऊन जाताना स्पॉट झाला होता. यानंतर तो पुन्हा सुशांत त्याच्या घरी दिसला नव्हता. दोघं लेट नाईट फिरतानाही अनेकदा स्पॉट झाले होते. असं असलं तरीही दोघांनी आपल्या नात्याबद्दल कोणताही घोषणा केली नव्हती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वीच तिनं सुशांतचं घरही सोडलं होतं.

सुशांत रियाच्या अफेअरच्या चर्चांनी तेव्हा जोर धरला होता जेव्ह लडाख ट्रीपवर दोघांचेही एकाच मुलासोबतच सेपरेट फोटो समोर आले होते. सुशांत आणि रिया खूप दिवस एकत्र राहिले. दोघं लग्नही करणार होते. परंतु रिया किंवा सुशांतनं यावर कधी खुलून भाष्य केलं नव्हतं.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती चेहरे सिनेमात दिसणार आहे. चेहरे सिनेमात ती बिग बी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी अशा मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे. याच सिनेमात क्रिस्टलही डिसूजाही दिसणार आहे. तसं पाहिलं तर तिचं करिअऱ काही खास नाही चाललं. मेरे डैड की मारुति, सोनाली केबल, जलेबी अशा सिनेमात लिड रोल करूनही रिया बॉलिवूडध्ये आपली जागा तयार करण्यासाठी झटत आहे.