Birthday SPL : ‘या’ अभिनेत्रीनं नाकारली होती फेअरनेस क्रीमची 2 कोटींची जाहिरात ! खऱ्या आयुष्यात आणि सिनेमातही करत नाही ‘मेकअप’

पोलिसनामा ऑनलाइन –साऊथ इंडियन सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिचा आज वाढदिवस आहे. साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी झाला होता. आज आपण तिच्या बद्दल काही इंट्रेस्टींग गोष्टी जाणून घेणार आहोत.

नाकारली होती 2 कोटींची जाहिरात

साई पल्लवी तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिनं फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची 2 कोटींची डील नाकारली होती. ती म्हणाली होती की, अशा जाहिरातीतून मिळणाऱ्या पैशांचं मी काय करू. घरी जाऊन तोच डाळभात तीन चपात्या मी खाणार आहे. माझ्या गरजा जास्त नाहीत.

साधेपणा पहिली पसंद

साई पल्लवीला मेकअप अजिबात आवडत नाही. सिनेमात काम करतानाही ती कमीत कमी मेकअप करत असते. कधी कधी तर काहीच मेकअप नाही करत. फक्त साऊथ इंडियातच नाही तर भारतभर तिचे चाहते आहे. साई आज टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे तरीही ती डाऊन टू अर्थ आहे.

व्यवसायानं डॉक्टर

आपल्या अभिनयानं लाखोंच्या मनावर राज्य करणारी साई पल्लवी व्यवसायानं डॉक्टर आहे. तिनं त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जॉर्जियामधून एमबीबीएसची डिग्री घेतली आहे.

साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात पाऊल टाकण्याआधी ती तेलगू सीजन डान्स शोचा हिस्सा होती. प्रेमम या मल्याळम सिनेमातून तिनं डेब्यू केला आहे. फिदा या सिनेमातून तिनं तेलगु सिनेमात डेब्यू केला आहे. साईनं तमिळ मल्याळम तेलगु अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. अथिरन, फिदा, काली, प्रेमम हे तिचे सुपरिहट सिनेमे आहेत.