#Birthday SPL : ‘हा’ असली कबीर सिंग एकेकाळी भाडं द्यायलाही पैसे नव्हते !

पोलिसनामा ऑनलाइन –साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याचा आज वाढदिवस आहे. विजयचा जन्म 9 मे 1989 मध्ये हैद्राबादमध्ये झाला होता. आज तो 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्याच्या आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत.

विजयचे वडिल देवरकोंडा गोवर्धन राव साऊथ इंडियन टीव्ही स्टार राहिले आहेत. तुम्हाला माहिती आहे का त्याच्या घरातली मंडळी त्याला त्याच्या नावानं नाही तर राउडी म्हणून हाक मारतात. याचं कारण म्हणजे तो लहानपणापासूनच खूप फटकळ आहे.

एका मुलाखतीत विजयनं आपल्या स्ट्रगलविषयी सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनेकदा असं होत होतं की, त्याच्या भाडं द्यायलाही पैसे नसायचे. परंतु त्यानं हार मानली नाही. आज तो साऊथमधील सुपरस्टार आहे.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं लवकरच विजय फायटर या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे. विजयनं 2011 मध्ये आलेल्या नुव्विला या सिनेमातून त्यानं डेब्यू केला होता. यानंतर त्यानं डिअर कॉमरेड, मेहनती आणि वर्ल्ड फेमस लवर असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 2017 मध्ये आलेल्या अर्जुन रेड्डी या सिनेमानं त्याला नॅशनल लेवलवर ओळख मिळाली. याशिवाय विजय निर्मातादेखील आहे. हिल एंटरटेंमेंट असं त्याच्या कंपनीचं नाव आहे. राउडी वियर नावाचा त्याचा एक क्लोथ ब्रँडही आहे.