Bishan Singh Bedi Passed Away | वर्ल्ड कप सुरु असतानाच टीम इंडियासाठी वाईट बातमी, भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे 77 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bishan Singh Bedi Passed Away | वर्ल्ड कप (World Cup 2023) सरु असतानाच टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन (Bishan Singh Bedi Passed Away) झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. बिशनसिंह बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. बिशन सिंग बेदी यांनी टीम इंडियाच्या नेतृत्वही केले होते. बेदी यांनी भारतासाठी 67 टेस्ट खेळल्या. 1967 ते 1979 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बेदी यांनी टेस्टमध्ये 266 विकेट घेतल्या. तर 10 वन डे मध्ये 10 विकेट घेतल्या होत्या.

https://x.com/PTI_News/status/1716397530894815720?s=20

एरापल्ली प्रसन्न, बीएस चंद्रशेखर, एस.व्यंकटरागवन यांच्यासह बिशन सिंग बेदी यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात स्पिन मध्ये क्रांती केली होती. बेदी यांनी भारताला पहिली वन डे मॅड जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी 1975 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ईस्ट आफ्रिकेविरुद्ध 12-8-6-1 अशी स्पेल टाकली आणि आफ्रिकेला 120 धावांवर रोखले. (Bishan Singh Bedi Passed Away)

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, तेव्हा ते फक्त 15 वर्षांचे होते आणि 1968-69 मध्ये
ते दिल्लीला गेले आणि 1974-75 च्या रणजी करंडक स्पर्धा गाजवली. यामध्ये त्यांनी 64 बळी घेतले.
बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधीत्व केले.
त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमेध्ये 1560 विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरात घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड, पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त