या ‘५’ बचत योजनामध्ये ‘सुरक्षित’ ठेवा पैसा, मिळेल भरघोस ‘व्याज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पैसे गुंतवताना आपण नेहमीच विचार करतो की आपले पैसे कसे सुरक्षित राहतील आणि त्यावर भरपूर व्याज पण मिळेल. बाजारात अनेक बचत पर्याय आहेत, ज्यात बचत करु तुम्ही योग्य ती ग्रोथ करु शकतात. परंतू गुंतवणूक करताना एक बाब महत्वाची असते ती म्हणजे गुंतवणूक संरक्षित आहे का? जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर हे ५ गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

१. फिक्स्ड डिपॉजिट –
फिक्स डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ज्यात बचत खात्यापेक्षा अधिकचे व्याज मिळते. या खात्याला एका ठरलेल्या काळासाठी सुरु करता येते. एफडीचे व्याजदर हे रक्कम किती काळासाठी बचत करुन ठेवण्यात येणार आहे यावर ठरत असते. फायनेंशियल बँक, पोस्ट ऑफिस आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये एफ डी करता येते.
२. आरडी –
आरडी एक असा सेविंग ऑप्शन आहे, ज्यात प्रति माहिना एक ठरलेली रक्कम सेव केली जाऊ शकते, त्यावर व्याज मिळते. देशातील सर्व प्रमुख वित्तीय संस्थामध्ये आरडी अकाऊंट सुरु करण्याची सुविधा आहे.

३. पब्लिक प्रॉविडेंट फंड –
पीपीएफ अकाऊंट रिटायरमेंट साठी खोलण्यात येते. यावरील व्याज दर तिमाहीच्या आधारे केंद्र सरकारकडून ठरवण्यात आल्या प्रमाणे देण्यात येते. सध्या ८ टक्के वार्षिक व्याज आहे.

४. मंथली इनकम स्किम –
सध्याच्या तिमाहीत एमआयएस अकाऊंट मध्ये ७.७ टक्के व्याज दर मिळेल. या स्किम मध्ये मॅच्युरिटी ५ वर्षात पुर्ण होते. या खात्यात अधिकतर ४.५ लाख रुपये आणि ज्वाइंट अकाऊंट मध्ये ९ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते.

५. एनपीएस
एनपीएस सरकारने सुरु करण्यात आलेली रिटायरमेंट प्लॉनिंग स्किम आहे. ज्यात पेंशन फंड नियामक आणि विकास प्रधिकरण (PFRDA)च्या माध्यमातून नियंत्रित केली जाते. या स्किममध्ये नोकरीच्या दरम्यान सेविंग केली जाते आणि रिटारमेंट नंतर पेंशनच्या पद्धतीने पैसे मिळतात.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण