Sachin Sawant : मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात ते मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे. आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (sachin sawant ) यांनी केला. मराठा आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारधारेप्रमाणेच भाजपची मानसिकता आरक्षणविरोधी आहे. असे सचिन सावंत (sachin sawant ) यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले सचिन सावंत?
सचिन सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणारी ‘Save Merit Save Nation ‘ ही संस्था आणि त्याचे पदाधिकारी भाजप व संघाशी संबंधित आहेत. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे RSS शी संबंधित असून नागपूरचेच आहेत. भाजपच्या कार्यातही या लोकांचा पुढाकार असतो याचे पुरावे समोर आले आहेत. तर सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे. फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाची लढाई सुरू असताना ही संस्था अस्तित्वात नव्हती. मात्र, उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूनं निकाल लागताच या संस्थेचं कामकाज सुरू झालं. ही संस्था मुख्यतः मराठा आरक्षणाच्या विरोधातच कार्यरत आहे, असे कागदपत्रावरून दिसते. असे सावंत यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी सरकार आणि मागील फडणवीस सरकारमुळंच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजप जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीच ५ जूनला आंदोलन केलं जाणार आहे. करोना सुपर स्प्रेडर म्हणून भाजपची ओळख आधीच निर्माण झालीय. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात ४ याचिकाकर्ते या संस्थेनं पाठवले होते असं या संस्थेच्या वेबसाइटवर नमूद आहे. डॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱ्याबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते, तरीही भाजप पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या संस्थेकडून नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते. डॉ. अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांशी संबंध आहेत. असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

Also Read This : 

Covid Somnia Cure : तुम्हाला कोरोना सोमनियाची समस्या तर नाही ना? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

 

खतांवरील अनुदान कसं मिळवायचं? कोणती कागदपत्रे लागतील?, जाणून घ्या

 

मंत्री आदित्य ठाकरेंनी पाठवली मदत ! पुणे शहरासाठी 10 तर पिंपरी चिंचवड साठी दिले 5 व्हेंटिलेटर