खतांवरील अनुदान कसं मिळवायचं? कोणती कागदपत्रे लागतील?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मागील काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीदरम्यान डाई अमोनिया फॉस्फेट (DAP) खतांवरील अनुदान वाढवण्याची घोषणा केली. यावरून DAP च्या ५० kg च्या पोत्यांवरील अनुदान ७०० रुपये होते. ते वाढवून १२०० रुपये करण्यात आलं होत. शेतकऱ्यांना DAP खरेदी करण्यासाठी आता १२०० रुपये द्यावे लागतील.

काय आहेत कागदपत्रे ?

– शेतकऱ्यांचा आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे.

– बायोमेट्रिक अर्थात अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील.

दरम्यान, वरील मोजकेच कागदपत्रे जमा केल्यानंतर केंद्र सरकार संबंधित कंपनीच्या खात्यात अनुदान जमा करेल. एका पोत्यामागं १२११ रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. डाई अमोनिया फॉस्फेट वरील अनुदानासाठी केंद्र सरकार कडून १४ हजार ७७५ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

अनुदान का वाढवलं?

कोरोनाच्या संसर्गामुळे मोठ्या देशांनी DAP खताच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालाचा दर वाढवल्यानं DAP खतांचे दर वाढले असल्याचं म्हटलं आहे. खतांच्या वाढत्या दरावरून शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारनं DAP आणि पीएंडके खतावरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच,

वाढवण्यात आलेल्या अनुदानाची मुदत ३१ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. यावरून २४११ रुपयाचे DAP च एक पोतं १२०० रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल. डाई अमोनिया फॉस्फेट वरील सबसिडी १४० % वाढवल्याचं केंद्राने सांगितलं आहे.

या दरम्यान, मफिल वर्षी DAP ची वास्तविक किंमत प्रति बॅग १७०० रुपये होती. तर डाई अमोनिया फॉस्फेट च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ १२०० रुपयांच्या जुन्या दराने देण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय १९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. DAP आणि पीएंडके या खतांवरील अनुदानात वाढ केल्याची अधिसूचना २० मे रोजी जाहीर केली गेली.

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

CBSE 12th Exam : 30 मिनिटांची असेल परीक्षा, एक जूनला केंद्रीय शिक्षणमंत्री सांगणार तारीख !

मंत्री आदित्य ठाकरेंनी पाठवली मदत ! पुणे शहरासाठी 10 तर पिंपरी चिंचवड साठी दिले 5 व्हेंटिलेटर

ठाकरे सरकारकडून उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द !

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 921 रूग्ण ‘कोरोना’मुक्त