धुळ्यात भाजपकडून आ. अनिल गोटेंच्या प्रतिमेचे दहन, जोडे मारो आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – संस्थापक कै.पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्याबद्दल सोशल मिडीयावर निंदात्मक, अभद्र लिखाण करुन अपमान केल्याच्यानिषेधार्थ भाजपातर्फे आ. अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शहरातील राणाप्रताप चौकात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी हिरामण गवळी यांनी माहिती देतांना सांगीतले की, भाजपाच्या तिकीटावर निवडून येवून आपणच भाजपाचे एकनिष्ठ व संघाचे स्वयंसेवक असल्याचा खोटा आव आणणारे आ. अनिल गोटे यांनी नुकत्याच झालेल्या मनपा निवडणूकीत कार्यकर्त्यांसह जनतेला व मतदारांना भूलथापा दिल्या. तसेच ज्यांच्या विचारांवर भाजपा पक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री व कार्यकर्ता चालतो असे महान व्यक्ति पं.दिनदयाल उपाध्याय यांच्याबद्दल अभद्र लिखाण करुन त्यांचा अपमान केला आहे.

आ. गोटेंनी दि.१६ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या मोबाईलवरुन सोशल मिडीयाद्वारे हे लिखाण केले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या भावनांना दुखावल्या आहेत. म्हणून भाजपा जिल्हा महानगरतर्फे आम्ही आ. गोटेंच्या प्रतिमेला जोड्यांचा मार देवून या घटनेचा निषेध करत असल्याचे हिरामण गवळी यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हिरामण गवळी, चंद्रकांत गुजराथी, अनिल थोरात, बंटी धात्रक, शशी मोगलाईकर, कुणाल चौधरी, अजय अग्रवाल, स्वप्नील लोकरे, यशवंत येवलेकर, सुभाष मराठे, मयुर सूर्यवंशी, सुधीर पोतदार, रत्ना बडगुजर, माजी महापौर जयश्री अहिरराव, वैशाली शिरसाठ, अमृता पाटील, मंजुषा लोहारे, किर्ती वराडे, केतकी विसपूते, भटू वराडे, पुनित वराडे, पापा मगरे, दीपक पगारे, कन्हैया पगारे, समाधान मिस्तरी, केतन घारु, हिरालाल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.