देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचे बायप्रॉडक्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा Agenda ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर Agenda आम्ही काम करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार  पडण आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस  एका वेबिनार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी फडणवीसांना सरकार पडणं हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असे विचारले असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचे नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अंतर्गत विरोधाभास दिसताना त्याला पाडणं हाच भाजपाचा कार्यक्रम असल्याची प्रतिमा का निर्माण होत आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, अशी प्रतिमा काही निर्माण होत नाही. पण माध्यमांनाही बातमी मिळते की हे पाडण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतात. या पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणं नाही, असे ते म्हणाले.

हे सरकार आपल्या वजनाने पडेल
मी म्हणालो होतो त्याप्रमाणे घडत आहे.
आपल्या अंतर्गत विरोधाने हे सरकार पडेल सांगितलं तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हतं.
पण आता लोकांना जाणवू लागलं आहे.
धोरणात्मकतेचा अभाव लोकांना जाणवत आहे. मी गंमतीने 3 पायांची रिक्षा असून 3 पाय वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे म्हणत होतो. पण आज हे जाणवत आहे. मला वाटतं आमच्याकडे खूप संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचं काम अचूक करत आहोत. जनतेची गाऱ्हाणी मांडत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला काही करायची गरज नाही, हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल”.

एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री
ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत.
अनेक जण मुख्यमंत्र्यांच्या आधीच निर्णय जाहीर करतात.
मीदेखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो. त्याचे काही संकेत असतात.
महत्वाचे धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचे असतात आणि मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला नेमतात त्यांनी ते जाहीर करायचे असते.
कारण त्याचे परिणामही तसे अपेक्षित असतात.
या सरकारमध्ये कितीही महत्वाचे निर्णय असो ज्याच्या मनात येईल तो निर्णय जाहीर करतो अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत