BJP JP Nadda On Shivsena | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा; म्हणाले – ‘महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील’

पाटणा : वृत्तसंस्था – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP JP Nadda On Shivsena) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आज देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नड्डा (BJP JP Nadda On Shivsena) यांनी दावा केला आहे की, देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसही अनेक राज्यांतून संपत चालली आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील. नड्डा यांनी बिहारमधील भाजपच्या (Bihar BJP) 16 जिल्हा पक्ष कार्यालयांचे पाटणा येथून उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.

 

काँग्रेस बहीण-भावाचा पक्ष
बिहारमधील विरोधी पक्षांवर टीका करताना नड्डा म्हणाले, बिहार ही लोकशाहीची भूमी आहे. येथे घराणेशाहीविरुद्ध केवळ भाजपच लढू शकते. बिहारमध्ये आम्ही राजदशी लढत आहोत, तो एका कुटुंबाचा पक्ष आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील कौटुंबीक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचा पक्ष हा एका व्यक्तिचा पक्ष आहे. महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे काँग्रेस बहीण-भावाचा पक्ष बनला आहे. (BJP JP Nadda On Shivsena)

जे. पी. नड्डा यांनी पाटणा येथील भव्य स्वागताची दखल घेत म्हटले की, कालच्या सोहळ्यावरून भाजपचे सामर्थ्य कसे वाढत आहे, हे लक्षात येते.
भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. ज्यांच्याकडे विचार नाहीत ते एकतर संपले किंवा संपतील.
आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो.
विचार नसलेले लोक संपले. जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप.

 

नड्डा पुढे म्हणाले, आम्ही कार्यालय म्हणतो, ऑफिस नाही. कार्यालय संस्कारांचे केंद्र असते.
भाजप आपल्या कार्यकर्त्यांना संस्कार शिकवतो. कार्यालयात बसल्याने एकमेकांसोबत काम करण्याचे संस्कार होतात.
भाजपचे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी शक्तीचे केंद्र आहे. येथून कोट्यवधी कार्यकर्ते तयार होतील.

Web Title :- BJP JP Nadda On Shivsena | in maharashtra shiv sena will die other parties too bjp president j p naddas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

 

Shivsena | खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रतिज्ञापत्र

 

CM Eknath Shinde | संजय राऊतांना ED कडून अटक ! CM एकनाथ शिंदे म्हणाले – ‘त्यांनी आम्हाला पण तुरुंगात….’