अरुण जेटलींवर उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थ आणि सरंक्षणमंत्री अरुण जेटली यांनी अखेर एम्स रुग्णालयामध्ये शेवटचा श्वास घेतला. अरुण जेटली यांच्यावर उद्या (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ए ४४ कैलास कॉलनी अस्थानी येथे आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत त्यांचे पार्थिव भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय ईतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

अरुण जेटली यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय –

नोटबंदी
– वस्तू व सेवा कर प्रणालीची देशभर अंमलबजावणी
– रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट
– देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय

आरोग्यविषयक वृत्त –