BJP Leader Sana Khan | नागपुरातील भाजप महिला नेत्याची हत्या? मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Leader Sana Khan | नागपुरातील भाजपच्या सक्रिय पदाधिकारी सना खान (BJP Leader Sana Khan) हिची हत्या (Murder) झाल्याचे समोर आले आहे. सना खानच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा (Amit Shahu) नोकर जीतेंद्र गौड (Jeetendra Goud) याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली. याबाबत पुढील तपास जबलपूर पोलीस (Jabalpur Police) करीत आहे.

भाजपा नेत्या सना खान (BJP Leader Sana Khan) 1 ऑगस्ट रोजी जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू शाहू याला भेटायला गेली होती. अमितच्या घरी मुक्काम केला. तिथे अमितचा ढाबा आहे. दोघांचे गोड नाते होते. त्यामुळे पोलिस दलात नोकरी करणाऱ्या अमित शाहू यांच्या पत्नीला संशय आला. 2 ऑगस्टच्या दुपारपासून सना ही बेपत्ता (Missing) झाली होती. त्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलिसात (Mankapur Police) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

महाराष्ट्र पोलिसांचे (मानकापूर) (Maharashtra Police) पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित शाहू हा फरार झाला होता.
त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरही पसार झाला होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक आधारे अमितचा नोकर जीतेंद्र गौड
याला शोधून अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिकीत रक्त सांडलेले होते.
ते रक्ताने माखलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले.

दरम्यान, सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात (Jabalpur Police Station) वर्ग केले आहे.
दरम्यान, जोपर्यंत सनाचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत तिची हत्या झाली, असे म्हणता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पण नोकराने दिलेल्या माहितीवरून सनाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे समोर आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पुण्यातील दर काय? जाणून घ्या