मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन (BJP Leader Shahnawaz Hussain) हे मुंबईत आले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी (Angiography) करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (BJP Leader Shahnawaz Hussain)
नेमकं काय घडलं?
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन हे मुंबईत आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे आढळून आल्याने अँजिओग्राफी करण्यात आली. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना खासगी वॉर्डमध्ये शिप्ट केले जाणार आहे.
शाहनवाज हुसैन (BJP Leader Shahnawaz Hussain) यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समजताच त्यांना
भेटण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली.
यापूर्वी ही शाहनवाज हुसैन यांना जेव्हा हृदयाविषयी त्रास जणवला होता तेव्हा त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा