Pune Crime News | लोणी काळभोर: दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा जाब विचारल्याने चौघा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने (Koyta) वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

या घटनेबाबत मनोज दिलीप मोरे (वय २४, रा. इंदिरानगर, कदम वाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०३/२३)दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रथमेश अहिरे (रा. सिंद्राममळा, लोणी काळभोर), प्रणव भारत सिरसाठ (रा. कदमवाक वस्ती), अभिजित अभिमन्यू आहेरकर (रा. लोणी काळभोर) आणि अभिषेक दत्तात्रय रामपुरे (रा. लोणी काळभोर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कदमवाक वस्तीत इंदिरानगर चौकात सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रथमेश अहिरे व प्रणव सिरसाठ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपींनी फिर्यादीस दुचाकीचा कट मारला. त्यावर फिर्यादी यांनी कट का मारला, असा जाब विचारल्याने त्याचा राग
येऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रावर कोयत्याने मारहाण (Beating) करुन त्यांना जबर जखमी केले.
आजुबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून
पोलीस उपनिरीक्षक गोरे (PSI Gore) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Traffic Changes | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे पवार-ठाकरेंना आव्हान, ‘उदयनिधींच्या विधानाला समर्थन असावे, मान्य असेल तर…’