Video : BKC पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर फडणवीसांनी केला ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकत साठा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, शनिवारी बीकेसी पोलिसांनी ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही गोष्ट ज्यावेळी भाजप नेत्यांना समजली त्यावेळी मध्यरात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं.

यावेळी भाजपा आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाड देखील उपस्थित होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस स्थानकात दाखल होत भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आलं.

 

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. ते म्हणाले राज्यात रेमडेसिवीरची कमतरता आहे. त्यामुळे प्रामाणिक हेतूने आम्ही सारे रेमडेसिवीर मिळाव्यात यासाठी प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. दुपारी एका मंत्र्यांचा ओएसडी फोन करून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो. त्यानंतर रात्री १० वाजता त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला असे ते म्हणाले.

स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला ‘महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना कायद्यानुसार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.