‘बारामतीवर जोर आणि मुंबई कमजोर’, पुरवणी मागणीवरून भाजप आमदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सादर केलेल्या 39 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये बारामतीवर जोर आणि मुंबई कमजोर अशी टीका भाजपचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. विधानसभेमध्ये नगर विकास, वने आणि महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

या चर्चेमध्ये शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईकर असल्यामुळे मुंबईकरांसाठी एखादी पुरवणी मागणी जास्तीची करण्यात येईल अशी आशा आम्हाला होती, असा टोला लगावला. बारामतीला देण्यास आमचा विरोध नाही मात्र मुंबईला थोडे झुकते माप मिळेल अशी आमची अपेक्षा होती. तसेच मुंबईसाठी नवे गारगाई धरण उभारण्यात येणार असून या धरणासाठी चार लाख झाडे तोडावी लागणार आहेत.

400 झाडे तोडली जातात म्हणून मेट्रो कारशेडे काम आपण थांबविले माग आता गारगाई धरणामुळे तोडण्यात येणाऱ्या झाडांचे आपण काय करणार याचे उत्तर सरकारने द्यावे आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा प्रश्न कसा सोडविणार याबाबतचे खुलासा सरकारने करावा अशी मागणी यांनी शेलार यांनी सरकारकडे केली. कार्टर रोड येथील कांदळवन, कोस्टल रोडमुळे तोडणार अशी भीती स्थानिकांमध्ये असून त्या कांदळवनाचे नेमके काय करणार याची ही स्पष्टता सरकारने देणे अपेक्षित आहे.

मेट्रो 1 चे ऑडीट सरकारने अद्याप केलेले नाही. रिलायन्स या मेट्रोतून किती फायदा झाला याचे ऑडीट करणार आहात का असा सवाल शेलार यांनी केला. दरम्यान नगर विकास मंत्री यांनी सर्वात प्राथमिकता या कामाला देऊन तातडीने स्ट्रकचरल ऑडीट करण्यात येईल असे सांगितले.