BJP MLA – CM Eknath Shinde | ‘आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, याची दक्षता घेऊन…’ भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA – CM Eknath Shinde | मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी जालना येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 15 दिवसांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा राज्यभर गाजला. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आणखी एक आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. राज्यात धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी उपोषण आणि आंदोलनं सुरु आहेत. यातच धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले (BJP MLA – CM Eknath Shinde) आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पडळकर म्हणतात, आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभा होईल. हे मी आपणास अत्यंत जबाबदारीने सांगतोय, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे. (BJP MLA – CM Eknath Shinde)

https://x.com/GopichandP_MLC/status/1703651903719272671?s=20

पडळकर यांनी मांडले 7 मुद्दे

Advt.
 1. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य (Ahilya Devi Samaj Prabodhan Manch Maharashtra State), मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात (High Court) दाखल याचिकेत (याचिका क्र. 4919/2017) अ‍ॅड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता सरकारतर्फे अर्ज दाखल करणे.
 2. मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे.
 3. ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या 22 योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपायोजना करणे.
 4. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर ‘स्वतंत्र कायदा‘ आणून त्यांना संरक्षण देणे, तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.
 5. आरेवाडीच्या बिरोबा मंदिर देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविंधासाठी
  आणि सुशोभिकरणासाठी 200 कोटी रूपयांचा निधी द्यावा.
 6. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने
  किल्ला ताब्यात घेऊन ‘किल्ले वाफगाव विकास आराखडा‘ त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.
 7. ज्या पद्धतीने औरंगबादाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे
  तात्काळ व ठोस पावले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या
  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणीसाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे.

पडळकरांनी पत्रात पुढे म्हटले की, आम्ही सर्व धनगर बांधव आमचे प्रश्न कायद्याने व संसदीयमार्गाने
मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत. परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो.
याबाबतची काळजी व दक्षता घेऊन वरील मुद्यांबाबतची बैठक त्वरित आयोजित करावी.
अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे ‘धनगर आंदोलन’ उभा राहू शकते.
ही बाब मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे? उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान