राजस्थान : भाजपाच्या आमदाराचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘राहुल, सोनिया, प्रियंका हे देशाचे दुश्मन’

जयपुर : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) विरोध केवळ सामान्य नागरिकच नाही तर विरोधी पक्षांनीही केला आहे. हे घटनेचे उल्लंघन असल्याचे बहुतेक विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. खासकरुन या संदर्भात काॅंग्रेसने सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. राजस्थानातील रामगंज मंडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. आमदार मदन दिलावर यांनी त्यांना देशाचे शत्रू म्हटले आहे.

मदन दिलावर म्हणाले की, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला घेऊन जे लोक देशाला जाळत आहे, पोलिसांची हत्या करत आहे, त्याचबरोबर त्यांचे समर्थन करत आहे ते देशाचे शत्रू आहेत.’ मग ते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा असो.

भाजप आमदार म्हणाले की, त्यांना देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना पाकिस्तान हवा असेल तर त्यांनी तिथे जावे. जर त्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी तिथे जावे. जर दोन्ही देशांना ते नको असतील तर ते हिंद महासागरात बुडू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/