Pune Crime News | बीबीएच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोथरुड एमआयटी मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोथरुड येथील एमआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. विनीत अरविंद मारु Vineet Arvind Maru (वय-19 रा. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पुणे पोलिसांच्या (Pune Police) नियंत्रण कक्षाला एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर मिळाली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (API Sameer Kadam) आणि मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विनीत याने चादरीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला होता.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
विनीत मारु हा कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता.
त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांना त्याच्याजवळ सुसाईड नोट सापडली नाही.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime News | सायबर चोराचं ऐकून अ‍ॅप डाऊनलोड, पुण्यातील महिलेला 4 लाखांचा गंडा

Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक, मुंबईतील बाफना मोटर्सच्या संचालकावर FIR

ACB Trap Case News | शेतीची खाते फोड करुन देणारा खाजगी पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़कर’ ! पोलिस उपनिरीक्षकाला मिळाले कोटयावधी, जाणून घ्या नेमकं काय झालं