Pune Crime News | पॉर्न व्हिडिओ दाखवून 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण, 23 वर्षाच्या तरुणाला अटक; कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील कात्रज परिसरामध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षाच्या तरुणाला 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याने कात्रज परिसरातील एका 17 वर्षाच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ (Porn Videos) दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार 2017 ते 2020 दरम्यान वारंवार घडला असून यामुळे पीडित मुलगी मानसिक रुग्ण बनली आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) मंगळवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋत्विक गणेश दगड (वय-23 रा. कोंढवा रोड, कात्रज) याच्यावर आयपीसी 376, 376/2/जे/एफ, 506 सह पोक्सो कलम 3बी, 4, 5/जे/1/एल/एन/पी नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋत्विक मुलीच्या घरी नेहमी ये-जा करायचा.
तो फिर्यादी यांच्या 17 वर्षाच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होता.
तसेच तिच्यासोबत गैरकृत्य केले. हा प्रकार अनेक दिवस सुरु होता. आरोपीच्या सततच्या त्रासामुळे मुलीच्या मनावर परिणाम झाला. तिला झटके येण्यास सुरुवात झाल्याने ती मानसिक रुग्ण बनल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम