BJP MLA Gopichand Padalkar | ‘शरद पवारांचे OBC प्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Gopichand Padalkar | भाजप नेते (BJP)आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. ‘शरदचंद्र पवार यांचं अचानकपणे ओबीसींप्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय. असं म्हणतात की ते कुठलंही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवत देखील नाहीत. परंतु, मला त्यांना एकच सांगायचं आहे की, केंद्रानं ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे, असा घणाघात देखील आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

काय म्हणाले पडळकर ?

आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, ‘हे हात कुणामुळे बांधले गेले ? केंद्रामुळे की आपल्या पै-पाहुण्यांच्या प्रेमामुळे ? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाचं मोठं केले. आणि जेव्हा जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले. असं ते म्हणाले. पुढे बोलताना पडळकर म्हणाले, ‘जो 2011 सालचा सेन्सेस अहवाल तुम्ही आता मागता आहात, त्यातील घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. भागिदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या असा हल्लाबोल देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, ‘नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते.
अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडायला लागते आहे, हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे.
तसेच, ‘मला जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारचं आहे की, तुम्हाला जातनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवा आहे?
ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा (Imperial data) द्यायचा
आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रियाच सुरू केलेली नाही.
असं पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

BHR Scam | बीएचआर घोटाळा ! भाजपचे आमदार चांदूलाल पटेल यांचा अटक पूर्व जामीन मंजूर

बाप तो बाप असतो ! राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्द वापराल तर पुणे शहरात फिरून देणार नाही…