नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर ‘प्रहार’, म्हणाले – ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तौत्के चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 21) सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी चिवळा बीच आणि मालवणच्या नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे. यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून 10 किमी आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला. इथे. फडणवीसजींचा 700 किमीचा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा. याद रखना शिवसेना अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळ कसे छान, सुंदर आहे हे दाखवल जाते आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका राणे यांनी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे राणे म्हणाले होते.