BJP MLA Prasad Lad | भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे जरांगेंवर टीकास्त्र, ”फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार, तरीही…”

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. (BJP MLA Prasad Lad)

यावर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे त्यांनी आता जाहीर करावे. त्यांच्या मागे ‘सिल्व्हर ओक’ आहे की, जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब आहे ते सांगावे. जरांगेंचे सत्य आता लोकांसमोर यायला लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. तरीही जरांगेंना सारखं सारखं फडणवीस यांचं नाव घ्यायला लावलं जात आहे.

प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे यांनी त्यांची नौटंकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपला वरदहस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नितेश राणेंचे जरांगेंना आव्हान, ”सागर बंगल्याची भिंत ओलांडून दाखवा, त्यांच्या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास”