पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ? भाजप आमदारने केलं ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परळी येथून पुण्यात आलेली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. तर या प्रकरणावरून ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. यावरून भाजप नेते आक्रमक होताना दिसत आहे. तर भाजपच्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केला आहे. तर यावरूनच सध्या मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगत आहे.

या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या भाजपकडून राजीनाम्याची मागणी होत होती. अशातच वनमंत्री संजय राठोड यांनी मतोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा, तसेच एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं, असं होता कामा नये. राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून त्यामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून या क्लिपमध्ये ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचा म्हणजेच तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचा दावा केला जात आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार अशी चर्चा रंगली होती. यामुळे भाजपने हा मुद्दा उचलून धरला आहे आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामध्ये आता संजय राठोड यांनी मुख्यत्र्याकडे राजीनामा दिल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप शिवसेनेने याबाबत कोणतेही भूमिका स्पष्ट केली नाही.