भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे अजब वक्तव्य; म्हणाल्या – ‘गोमुत्र प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोमूत्र काढा पिल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी दररोज गोमूत्र काढा पिते म्हणून मला कोरोना झालेला नाही. यामुळे प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असा एक विचित्र दावा मध्य प्रदेश येथील भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे.

त्यांच्या या नव्या वक्तवयावरून वादाला तोंड फोडलं गेलं आहे. खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारीच्या प्रकोपात सर्वानीच खूप सावध रहायला हवे. सरकारने घालून दिलेल्या कोरोनाबाबत नियमांचे सर्वानी कसोशीने पालन करायला हवे, खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यासाठी आल्या होत्या तेव्हा त्यांनी असे भाष्य केले आहे.

जगभरातले शास्रज्ञ कोरोनावरील लस आणि कोरोना च्या विषाणूच्या नवनवीन रुपांवरील उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकीकडे ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत आहे, सरकारी यंत्रणा नागरिकांना सुविधा पुरवण्यास अपुऱ्या पडत आहेत अशात अशी वक्तव्य जाहीर कार्यक्रमात केल्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ शकतो याचंही भान खा साध्वी प्रज्ञा यांना राहिलं नाही.

आता वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जाता आहेत घरगुती उपचार सुचवले जात आहेत त्यामुळे वाढणाऱ्या संभ्रमात भर घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये. खा. साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यावर आता तर्कवितर्क चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान, मध्य प्रदेश राज्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी प्रज्ञासिंह यांच्या बंगल्यावरचा सर्व स्टाफला कोरोना झाला होता. तसेच मागील महिन्यात मध्य प्रदेश मधील कोरोना रुग्णाची संख्या घटत आहे. तर मागील २४ तासात ७ हजार ५७१ नवे बाधित आढळून आले आहेत.