BJP on Uddhav Thackeray | ‘तूच आहे, तुझ्या अपमानाचा शिल्पकार…’, भाजप आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP on Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक (England PM Rishi Sunak) यांचं नाव घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती विकत घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (BJP on Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री अवघ्या चार वाक्यात घरबश्याच्या अब्रूचे खोबरे केले. तूच आहेस तुझ्या अपमानाचा शिल्पकार, अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. भातखळकर यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट लिहून खोचक टीका (BJP on Uddhav Thackeray) केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची पोस्ट केली आहे.

नेमकं काय म्हणाले अतुल भातखळकर?

तूच आहे तुझ्या अपमानाचा शिल्पकार… ऋषि सुनक मला म्हणाले, How is UT? मी म्हणालो Why? तर ऋषि सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात, प्रॉपर्टी बनवतात. थंडगार हवा खातात. लंडनला आलात की मी तुम्हाला सगळं सांगतो,”… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. फक्त चार वाक्यात मुख्यमंत्र्यांनी पडवळदंडू घरबश्याच् अब्रूचे खोबरे केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

सोमवारी जळगावमधील पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत.
त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात. मोठमोठ्या संपत्ती खरेदी करतात,
थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी तुम्हाला सगळं सांगतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे.
आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल,
असा इशारा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Viral Video | ‘मुद्दामहून काही विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करतायत’, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”