BJP on Uddhav Thackeray | शरद पवारांसोबतचं व्यंगचित्र काढत भाजपाचं ट्वीट; राष्ट्रवादीनं दिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP on Uddhav Thackeray | मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठण तसेच हिंदुत्वाचा मुद्दा यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यानंतर आता 8 जूनच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विरोधकांना उत्तर देणार आहेत. मात्र भाजपाने (BJP) या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP on Uddhav Thackeray)

 

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सतत राजकीय शीतयुद्ध रंगत आहे. तसेच अनेक कारणावरुन आरोप प्रत्यारोपही होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून भाजपने निशाणा साधला आहे.

भाजपाने ट्विटरला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर “हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे” असं वृत्त सुरू आहे. त्याचबरोबर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून त्यावर ते होय साहेब असं उत्तर देत असताना दाखवलं आहे.

 

Advt.

भाजपच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनीही उत्तर दिलं आहे. ”वास्तविक शिवसेना वेगळा पक्ष आहे त्याची वेगळी विचारसरणी आहे. 2019 मध्ये किमान – समान कार्यक्रमाच्या आधारावर आम्ही एकत्र आलो. महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्विकारलं. यामुळे महाराष्ट्र पुनश्च प्रगतीपथावर आलं आणि म्हणूनच भाजपाच्या पोटात दुखत असल्याने वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत. तर, 2024 लाही पुन्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा भाजपचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगणार असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- BJP on Uddhav Thackeray | bjp tweets cartoon of ncp sharad pawar and maharashtra cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा