पंतप्रधानांच्या जन्म दिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ सुरु, गृहमंत्री अमित शहा यांनी एम्स रुग्णालयात मारला झाडू (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भेट दिली आणि दवाखान्यातील रुग्णांची चौकशी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त अमित शहा यांनी ‘सेवा सप्ताह’ची सुरुवात केली आहे.

या निमित्त अमित शहा यांनी रुग्णांना फळे वाटप करत स्वच्छतेचा संदेश दिला तसेच एम्स रुग्णालयात झाडू मारून स्वच्छताही केली. भाजपचे खासदार हंसराज हंस यांनीही यावेळी उपस्थिती दाखवत रुग्णांची विचारपूस केली. खासदार गौतम गंभीर समवेत अनेक खासदार यावेळी उपस्थित होते.

या आधीही गुजरात सरकारने नरेंद्र मोदींच्या १७ सप्टेंबर रोजी असलेल्या जन्म दिवसानिमित्त सरदार सरोवर आणि अन्य ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याच्या कारणामुळे उत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अहमदाबादमध्ये या दिवशी शाळांमध्ये काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्याबद्दल भाषणे आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

गुजरातमध्ये सतत सुरु असलेल्या पावसामुळे सरदार सरोवराची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.मोदींच्या जन्म दिवसापर्यंत ही पातळी खूप जास्त वाढणार आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री विजय रूपांनी यांच्या उपस्थितीत ‘नर्मदा आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –