भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी 32 उमेदवारांच्या नावाची घोषणा

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – भारतीय जनता पार्टीनं विविध राज्यात होणार्‍या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारांची यादी आज (रविवार) जाहीर केली आहे. त्यामध्ये 32 उमेदवारांचा समोवश आहे. आसाम, ओडिशा, छत्‍तीसगड, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, केरळ, मेघालय, पंजाब, बिहार, उत्‍तरप्रदेश, सिक्‍कीम, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

घोषणा करण्यात आलेल्या राज्याचं अथवा ठिकाणाचं नाव आणि त्यापुढे किती ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे हे पुढील प्रमाणे –

1. उत्‍तरप्रदेश – 10
2. तेलंगणा – 1
3. सिक्‍कीम – 2
4. राजस्थान – 1
5. पंजाब – 2
6. ओडिसा – 1
7. मेघालय – 1
8. मध्यप्रदेश – 1
9. केरळ – 5.
10. हिमाचल प्रदेश – 2
11. छत्‍तीसगड – 1
12. बिहार – 1
13. आसाम – 4

Visit : Policenama.com