भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या १० आमदारांना ‘नो-एन्ट्री’

पणजी : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात भविष्य दिसत नसलेल्या अनेक आमदारांनी आणि खासदारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणात १२ आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर आता गोव्यात देखील असाच गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी हा आरोप केला आहे. काँग्रेस पक्षाच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार होता मात्र आमच्या पक्ष श्रेष्ठींनी त्याला मान्यता दिली नाही. आम्हाला कोणताच पक्ष अस्थिर करायचा नाही. त्यामुळे आम्ही त्यास नकार दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले होते कि, काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना तेंडुलकर म्हणाले कि, बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावेत. काँग्रेसचे आमदार घाबरले आहेत. देशात आणि राज्यात पुढील पंचवीस वर्ष भाजपचीच सत्ता राहणार असल्याने काँग्रेस आमदार घाबरले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचेच देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे, असे तेंडुलकर म्हणाले. त्यामुळे आम्हाला आता कोणत्याही आमदाराच्या सपोर्टची गरज नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगिले.

आरोग्य विषयक वृत्त –

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?