भाजपची खेळी, उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमाला परवानगी नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करून आगामी निवडणुकीत मतांचा कोटा भरून काढण्याची तयारी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. राम मंदिर कधी बांधणार आहे हे जाहीर करा अथवा हा केवळ चुनावी जुमला होता असे जाहीर करा. असा खरमरीत सवाल करत शिवसेनेने चलो अयोध्याचा नारा दिला आहे. अयोध्येत जाऊन हिंदू मतांना हुंकार घालण्याची उध्दव ठाकरे तयारी करत असल्याचे म्हणले जाते आहे. शिवसेनेचा हा अयोध्या अशवमेध रोखावा कसा ? या विचारात असलेल्या भाजपने मोठी रणनीती आखली आहे का असा सवाल सर्वत्र विचारला जातो आहे. कारण शिवसेनेच्या कार्यक्रमाला परवानग्या अद्याप मिळाल्या नाहीत.

राम मंदिर मुद्द्याचे राजकारण भाजपने वेळोवेळी केले असून मंदिर कधी बांधणार असा सवाल शिवसेनेच्या वतीने अयोध्येत जाऊन विचारण्याचा चंग उध्दव ठाकरे यांनी बांधला आहे. भाजपच्या राम मंदिर राजकारणाचा सरे आम बोभाटा ! तेही त्यांच्याच हिंदुत्ववादी मित्र पक्षाने करावा हि बाब साधी नाही म्हणून या बाबीने सर्वांचे लक्ष वेधले असताना भाजप शिवसेनेच्या परवानग्या रोखणार का असा सवाल सर्वत्र विचारला जातो आहे. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याला भाजपने जर खीळ बसवली तर शिवसेना आणि भाजपच्या वादाला नवे तोंड फुटेल असे म्हणता येईल.

नेटीजनवर आला बाळासाहेबांच्या अभिवादनाचा महापूर 

असा आहे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि यांचा विशाल पक्षकबिला एकत्रित रीत्या २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होणार असून त्यांच्या हस्ते अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर पूजा होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उद्धव ठाकरे राम मंदिराच्या जागी जाऊन राम जन्म भूमीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सांयकाळी साधू संतांना भेटून त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत. उध्दव ठाकरे त्यानंतर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रा बाहेरची उद्धव ठाकरे यांची हि पहिलीच जाहीर सभा असून त्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या आधी परवानगीसाठी  संजय राऊत यांनी घेतली होती योगी आदित्यनाथ यांची भेट 
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या संदर्भाने संजय राऊत यांनी दोन आठवड्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. त्या भेटीमध्ये त्यांनी कार्यालयीन परवानग्या संदर्भात बोलले आहे. त्यावेळी परवानगी संदर्भात सर्व परवानग्या तातडीने देऊ असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. परंतु काही तांत्रिक कारणाने या परवानग्या रोखल्या गेल्या आहेत. त्या सोमवार पर्यत मिळतील असेही शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा या बद्दल सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच राजकीय वर्तुळात या बद्दल मोठी चर्चा रंगात आली आहे.