BJP vs NCP | अनिल देशमुखांना लपायला देखील राष्ट्रवादीने सुरक्षित जागा दिलीय का? भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  BJP vs NCP | भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (rural development minister hasan mushrif) अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत. त्यासाठी न्यायालयात स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून १० लाख रुपयांची मदत त्यांना केली जाणार आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर (mla atul bhatkhalkar) यांनी निशाणा (BJP vs NCP) साधला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

 

सोमय्यांविरुद्ध राष्ट्रवादी हसन मुश्रीफांना १० लाख देणार असे वृत्त आहे. अशीच अनिल देशमुखांना लपायला सुरक्षित जागा ही पक्षातर्फे देण्यात आली आहे का, असा सवाल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने शेकडो कोटींचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळत किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं सांगितले आहे.
त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाव्याची स्टँप ड्युटी भरण्यासाठी व्हाईट मनी लागतात,असा टोला हाणला होता.
दरम्यान, अब्रुनुकसानीचा दावा करताना न्यायालयात स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे.
त्यासाठी गढहिंग्लजकरांचा खारीचा वाटा म्हणून शहर राष्ट्रवादीने १० लाख निधी देण्याचा संकल्प केला आहे.
तसेच वंदूर ग्रामस्थ पाच लाख रुपये गोळा करून मंत्री मुश्रीफ यांना देणार आहेत.

Web Title : BJP vs NCP | Did the NCP even give Anil Deshmukh a safe place to hide? Question of BJP leader