×
HomeराजकीयBJP Vs Shivsena | 'पैसे फेकल्यास संजय राऊतासारखे खूप लोकं बाजारात मिळतात',...

BJP Vs Shivsena | ‘पैसे फेकल्यास संजय राऊतासारखे खूप लोकं बाजारात मिळतात’, नितेश राणेंचा राऊतांवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन BJP Vs Shivsena |केंद्रीय मंत्री नरायण राणे यांना अटक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (BJP and Shivsena) यांच्यामध्ये वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. एकीकडे सामनामधून (Saamana) नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. आता भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आक्रमक भाषेत बोचरे प्रत्युत्तर दिले आहे. पैसे फेकल्यास बाजारात संजय राऊतांसारखे खूप लोक मिळतात, असे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे. राणे विरुद्ध शिवसेना यांच्या वादात संजय राऊत यांच्यावरही सतत प्रहार होत आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे बोलत होते. शिवसेना खासदार भावना गवळी (shivsena mp bhavana gawali) आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने नोटीस (ED notice) बजावल्याचे वृत्त समोर आले.
त्यानंतर शिवसेना नेत्यांनी केंद्र सरकारवर (central government) आरोप केले.
शिवसेना नेत्यांच्या पाठिमागे भाजपनेच ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप होत आहे.
यासंदर्भात नितेश राणे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
बाजारात असे खूप लोकं भेटतील. जे तुमच्यासाठी ट्विट करतील,
तुमच्यासाठी लोमटेगिरी करतील, पैसे फेकल्यास बाजारात संजय राऊतांसारखे खूप लोकं मिळतात.
पैसा फेको तमाशा देखो अशी ती व्यक्ती आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.

 

नितेश राणेंचा सल्ला

नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले,
कोण राणे म्हणणारे दोन दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरेंच्या मिठाला जागतो हे दाखवत आहे !
स्व. माँ साहेबांबद्दल यांनी काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

Web Title : BJP Vs Shivsena | if you throw money you can get lot people sanjay raut market nitesh rane shiv sena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सामान्य प्रशासन विभाग मुंबईत विविध पदांसाठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Modi Government | दररोज 1 रूपया पेक्षाही कमी पैशात मिळतोय 2 लाख रुपयांचा विमा, जाणून घ्या काय ‘ही’ मोदी सरकारी योजना

Pune Court | खून प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News