भाजपला हवेत मतदारांच्या वाहनांचे क्रमांक, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सूचना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

प्रत्येक गोष्टीत अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणाऱ्या भाजपने आता मतदारांच्या वाहनांचे क्रमांकही गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तशा सूचना अनेक नगरसेवकांना भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. किमान दहापैकी पाच मतदारांच्या घरातील वाहने किती व क्रमांक काय, याची माहिती गोळा करा, असे फर्मान सोडण्यात आले आहे. या कामामुळे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B077FPZZRY,B0779YR99C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0bbf1010-b96b-11e8-95c8-7b30798b9a89′]

मिसड्कॉल देऊन पक्ष सदस्य जमविण्याची अफलातून मोहिम भाजपने राबविली होती. त्यामुळे जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष अशी ओळख भाजपने करून घेतली आहे. पक्षाचे ११ कोटी सदस्य असल्याचा दावा करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा आकडा कायम होता. आता हा आकडा तब्बल अडीच कोटींनी घटल्याने भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे आगामी निवडणुकांसाठी विविध योजना राबविण्यास भाजपने सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून मतदारांच्या घरातील माहिती घेतली जात आहे.

विरोधकांच्या आरोपांमुळे दानवेंचे मानसिक संतुलन बिघडलेय : अशोक चव्हाण

नागपुरमधील कार्यकर्त्यांनी बुथप्रमुख व पेजप्रुमख अशी सर्वच कामे आतापर्यंत मेहनतीने पार पाडली आहेत. मात्र, आता पेजप्रमुखांना मतदारांच्या वाहनांचे क्रमांक गोळा करण्यास सांगितल्याने नाराजी पसरली आहे. नव्या कार्यक्रमानुसार प्रत्येक पेजप्रमुखावर वाहनांचे क्रमांक आणणे बंधनकारक करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने पक्षाकडून संबंधित पेजप्रमुखांना तसे कळविले जात आहे. एका पेजवर दहा मतदार असतील तर, त्यातील किमान पाच ते सात मतदारांच्या घरी किती वाहने आहेत, त्यांचे क्रमांक काय, याचा डाटा तातडीने सादर करा असे, निर्देश देण्यात आल्याची माहिती मनपातील काही नगरसेवकांनी दिली. एखाद्या मतदाराच्या घरी गेल्यावर वाहनांचे क्रमांक मागितले वा लिहिले तर वादही होऊ शकतात, अशी भिती हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, वाहनांचे क्रमांक गोळा करण्यामागील उद्देश काय, हे पेजप्रमुख उघडपणे सांगायला तयार नाहीत. केवळ पक्षाने सांगितले, ते करायचे, असे ते सांगत आहेत.

पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन, फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी