आगामी निवडणुकीत भाजप कडून घटक पक्षांना केवळ १८ जागा ? घटकपक्षांची नाराजी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेतील दमदार विजयानंतर आता भाजपाचा आत्मविश्वास उंचावल्याचे दिसत असून राज्यातील विधानसभा निवडणुकीत मात्र एनडीएतील लहान पक्षांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लहान पक्षांची भाजप १८ जागांवर बोळवण करणार असल्याच्या बातम्या आहेत. यामुळे छोटे पक्ष नाराज असल्याचे दिसते.

राष्ट्रीय समाज पक्ष :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी ५२ जागांची मागणी केली आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिलेल्या माहिती नुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारामध्ये आलेल्या महापुरात दुभती जनावरे मोठ्या प्रमाणात गमावल्याने शेतकर्‍यांना दुभती जनावरे देण्याचा विचार सरकार करत आहे. एक दुभती गाय आणि म्हैस देऊन शेतकर्‍यांना रोजगार देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे जानकर यांनी सांगितले. या पक्षाला कमीत कमी १२ जागा मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरपीआय :
आरपीआयने २२ जागांची मागणी केली असून कमीत कमी ८ ते १० जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. आज आरपीआयसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. त्यावेळी मुंबईतील ४ जागांची मागणी करण्यात आली. या जागा दलित बहुसंख्यांक आहेत.

आरोग्यविषयक वृत्त