देशाची मागणी असताना पं. नेहरूंनी जनसंघाचे संस्थापक डॉ. मुखर्जींच्या मृत्यूची चौकशी केली नाही : जेपी नड्डा

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी संपुर्ण देशवासियांनी केली होती. मात्र, त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चौकशी केली नाही. या गोष्टीला इतिहास साक्षीदार आहे. भाजप मुखर्जींच्या बलिदानास कधीही विसणार नाही असे वक्‍तव्य भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. डॉ. मुखर्जी यांची आज पुण्यतिथी आहे. भाजप मुख्यालयात त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष नड्डा आणि इतर नेते उपस्थित होते.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉ. मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातील एका अधिकार्‍याने प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तृणमूल काँग्रेसला आता लक्षात आले आहे. देश हिंदुत्वाने जिंकण्यासाठी केवळ बंगाली ओळख पुरेसी नाही. त्यामुळे ममता आता मुखर्जींना नेता बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने कोलकत्‍ता येथील केयोरतला बर्निंग घाटावर डॉ. मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली.

डॉ. मुखर्जींचा संशयास्पद मृत्यू

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 मध्ये कोलकत्‍ता येथे झाला होता. त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताचा पुर्ण आणि अभिन्‍न अंग बनविण्याचा संकल्प केला होता. त्यांनी संसदेतील भाषणात कलम 370 रद्द करण्याची शिफारस केली होती. संकल्प पुर्ण करण्यासाठी सन 1953 मध्ये डॉ. मुखर्जी हे विनापरवाना जम्मू-काश्मीरच्या यात्रेवर निघाले होते. जम्मू-काश्मीरला पोहचल्यावर त्यांना ताब्यात घेवुन नजरबंद करण्यात आले. 23 जून 1953 रोजी संशयास्पद स्थितीत त्यांचा मृत्यू झाला.

सिने जगत –

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत