गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी शिक्रापुरात भाजपाचे भिकमांगो आंदोलन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांचे वेगवेगळे कारनामे सारखे उघड होत असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला तब्बल शंभर कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाल्याने गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी करत सरकार मधील मञ्यांना पैसे कमी पडत असल्याने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने शिक्रापुर मध्ये भिक मांगो आंदोलन करण्यात आले.

शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील चाकण चौकात आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले, याप्रंसगी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, माजी सदस्य राजेंद्र भुजबळ, भगवान शेळके, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, कैलास सोनवणे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भुजबळ, पंडित भुजबळ, सणसवाडी ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर, संतोष करपे, बापूसाहेब चव्हाण, केशव पाचर्णे, विशाल हरगुडे, नवनाथ सासवडे, डॉ. राजेंद्र भुजबळ, बापूसाहेब काळे, संजय सावंत यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला, तर यावेळी बोलताना तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार हे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे, यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, माजी सदस्य भगवान शेळके, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, कैलास सोनवणे, संतोष करपे यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले तर यावेळी बोलताना सध्याचे सरकार हे कोणतेही निर्णय घेत नसून जनतेची दिशाभूल करत असून सरकार अपयशी ठरत आहे असे सांगत गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत गृहमंत्र्यांचे सचिव संजीव पलांडे हे शिरूर तालुक्यातील माजी आमदारांचे सुपुत्र आहेत ते देखील यामध्ये सामील असल्याने हि शिरूर तालुक्यासाठी अपमानाची बाब असल्याचे देखील भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केली. दरम्यान सरकारचे मंत्री हे सर्वसामान्यांकडून आर्थिक लुट करत असल्याने आणि उघड उघड पैशांची मागणी करत असल्याच्या निषेधार्थ झोळी फिरवून सुट्टे पैसे गोळा करण्यात आले असून ते पैसे देखील सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.