Black Flag Shows To Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची कार मनमाडमध्ये अडवली, घोषणाबाजी करत दाखवले काळे झेंडे

नाशिक : Black Flag Shows To Sambhaji Bhide | नाशिकमधील मनमाड (Manmad Nashik) येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची गाडी जमावाने अडवली आणि घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. संभाजी भिडे हे येवला येथून मालेगावला निघाले होते. आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी ही घोषणाबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

संभाजी भिडे यांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना पोलिसांनी जमावाला दूर केले.
काही तरुणांनी कारसमोर येत संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. जमावाला पोलिसांनी बाजूला केल्यानंतर भिडे
यांची कार मार्गस्थ झाली.

भिडेंची कार अडवणाऱ्या तरुणांच्या हातात निषेधाचे बॅनर होते. भिडेंची कार अडवल्यानंतर काहींनी कारच्या मागच्या
आणि पुढच्या काचेवर हाताने जोरजोरात फटकेही मारले. तर एका तरुणाने पायातला बूट काढून काचेवर मारला.
यावेळी पोलिसांनी आक्रमक कार्यकर्त्यांना बाजूला केले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. यानंतर भिडेंची गाडी मार्गस्थ झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sinhagad Road News | महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त

पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून पिस्टलसह अटक

Pune Crime Branch News | घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक; 3 गुन्हे उघडकीस, 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Video)