ब्लॅक फंगसचा धोका कोणाला आहे ? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय; AIIMS चे संचालक डॉ. गुलेरिया अन् डॉ. मेदांता यांनी दिली महत्वपुर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांच्यावर आता ब्लॅक फंगसचा धोका आहे. देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसची 5,500 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये 1,500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्लॅक फंगसचा धोका वाढल्याने वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि मेदांता हॉस्पिटलचे डॉ. राजा त्रेहान यांनी म्यूकोरिया (ब्लॅक फंगस) बाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. त्रेहान यांनी सांगितले की, मधुमेहाच्या रूग्णांसह कँसरचे रूग्ण आणि अवयव प्रत्यारोपनाचा उपचार करत असलेल्या लोकांना ब्लॅक फंगसचा धोका जास्त असतो. मातीत ब्लॅक फंगस आढळतो. मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जोखीम नाही.

कोरोना उपचारादरम्यान किंवा अगोदरपासून ज्यांना स्टेरॉईड दिले जाते त्यांच्यात ब्लॅक फंगसचा धोका वाढतो. या लोकांना हाय ब्लड शुगर होण्याचा धोका जास्त असतो. ब्लॅक फंगसच्या धोक्यापासून वाचण्यासाठी शरीरात शुगरची मात्रा वाढू देऊ नये. मधुमेहाच्या रूग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.

ज्या लोकांना शुगर नाही, परंतु जे नियमित स्टेरॉईड घेतात, त्यांनी नियमित शुगर तपासली पाहिजे. स्टेरॉईडचा वापर शक्यतो टाळला पाहिजे.

जर तुमचे नाक भरत असेल, डोकेदुखी आहे, चेहर्‍यावर वेदना किंवा सूज आली आहे, चेहरा सुन्न होणे, चेहरा काळा पडणे, सूजलेल्या भूवया, दात ढीले होणे, अशी लक्षणे असतील तर तुमच्यावर ब्लॅक फंगसचा हल्ला झाला आहे.

औषधांच्या मदतीने ब्लॅक फंगस बरा होतो. कधी-कधी सर्जरीची आवश्यकता असते. चार ते सहा आठवड्याच्या औषधानंतर ब्लॅक फंगस ठीक होतो. मात्र, जर स्थिती गंभीर असेल तर तीन महिन्यांसाठी उपचाराची आवश्यकता असते.